समाजभाषाशास्त्रात, बहुलिपीत्व म्हणजे एकाच भाषेसाठी एकापेक्षा अधिक लेखन पद्धती वापरणे. एककालिक बहुलिपीत्व हे एकाच भाषेसाठी दोन किंवा अधिक लेखन प्रणालींचे सहअस्तित्व आहे, तर काळसापेक्ष बहुलिपीत्व (किंवा अनुक्रमिक बहुलिपीत्व ) हे एका विशिष्ट भाषेसाठी दुसऱ्या लेखन पद्धतीचे पुनर्स्थित करणे आहे.
हिंदुस्थानी भाषा, म्हणजेच उर्दू अक्षरांमध्ये लिहिलेली उर्दू भाषा आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा, समकालिक बहुलिपीत्वाचे उत्तम 'पाठ्यपुस्तकी उदाहरणे' आहेत, ज्या प्रकरणांमध्ये समकालीन लेखन प्रणाली वापरली जाते. पायाभूतपणे उर्दू आणि हिंदी या एकच भाषा, म्हणजेच हिंदुस्थानी भाषा आहे. पण १९व्या शतकातील धार्मिक राजकारणामुळे भारत-पाकिस्तान विभाजन झाले. तसेच हिंदुस्थानी या एकच भाषेचे धर्माच्या-आधारे विभाजन झाले, जिथे मुस्लिमांनी हिंदुस्थानी भाषा उर्दू लिपीत व उर्दू नावाने म्हणून स्वीकारली आणि हिंदूंनी हिंदुस्थानी भाषेला देवनागरी लिपीत व हिंदी या नावाने स्वीकारली. देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदुस्थानी भाषेला हिंदी म्हणतात, आणि उर्दू लिपीत(फारसी व अरबी लिपीचे मिश्रण) लिहिलेल्या हिंदुस्थानी भाषेला उर्दू भाषा म्हणतात. याचा व्यावहारिक पुरावा म्हणजे, दोन्ही भाषा पाठ्यपुस्तकी लेखन व लेखणपद्धतीच्या दृष्टीने भिन्न जरी असल्या तरी सामान्य बोलचालीत, श्रवण व व्याकरणात या दोन्ही भाषांमध्ये अगदी स्पष्ट साम्यत्व आढळते.
काळसापेक्ष बहुलिपीत्वाचे आणखी एक उदाहरण, जेथे एक लेखन प्रणाली दुसऱ्या लेखन पद्धतीशी बदलते, हे तुर्की भाषेच्या संबंधात आढळते, ज्यात पारंपारिक अरबी लेखन प्रणाली १९२८ मध्ये लॅटिन-आधारित प्रणालीने बदलली गेली.
बहुलिपीत्वाचा भाषा नियोजन, भाषिक धोरण आणि भाषिक विचारसरणीवर परिणाम होतो.
बहुलिपीत्व
या विषयातील रहस्ये उलगडा.