एक सुंदर वृक्ष म्हणून बहाव्याची सर्वत्र ख्याती आहे.
शास्त्रीय नाव: Cassia fistula L.
कुळ: Caesalpinaceae
मराठी नाव: बहावा, कर्णिकार.
संस्कृत नाव: आरग्वध
इंग्रजी नाव: Labernum
हिंदी नाव: अमलतास
बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात.
वर्णन बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो.पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो.बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते.
बहावा
थोडक्यात पण महत्त्वाचे.