बदनापूर विधानसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

बदनापूर विधानसभा मतदारसंघ - १०२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार बदनापूर मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. बदनापूर तालुका, २. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि राजूर ही महसूल मंडळे आणि २. अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड, धनगर पिंपरी, अंबड ही महसूल मंडळे आणि अंबड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

भारतीय जनता पक्षाचे श्री. नारायण तिलकचंद कुचे हे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →