बजरंगी भाईजान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बजरंगी भाईजान हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानचे दिग्दर्शन असलेला व सलमान खान ची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १७ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला. हर्षाली मल्होत्रा ह्या बालकलाकाराची मुख्य असलेल्या ह्या चित्रपटात करीना खान सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत चमकली तर नवाजुद्दीन सिद्दिकी, शरत सक्सेना ह्यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे संगीत प्रीतम ने दिले आहे.

ह्या चित्रपटामध्ये शाहिदा नावाची एक मुकी पाकिस्तानी मुलगी आपल्या आईसमवेत दिल्ली-लाहोर रेल्वेने प्रवास करीत असताना हरवते व भारतामध्येच राहते. बजरंगी नावाच्या एका इसमाला ती सापडते व तो तिला सुखरूपपणे पाकिस्तानात तिच्या पालकांकडे पोचवण्याची जबाबदारी हाती घेतो अशी कथा बजरंगी भाईजानमध्ये रंगवली आहे.

रमजान ईदच्या काळात प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने तिकिट खिडकीवरील अनेक विक्रम तोडले. सध्या हा भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उत्पन्न मिळवलेला चित्रपट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →