फ्रेंच फ्राईज

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फ्रेंच फ्राईज

फ्रेंच फ्राईज हे तेलात तळलेले बटाटे असतात. हे बटाटे चौकोनी आकारात कापून तुरटीच्या पाण्यात भिजवून मग तळतात. या पदार्थाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात. उदा. फिंगर चीप (भारतीय इंग्रजी) , फ्राईज (नॉर्थ अमेरिकन इंग्लिश), चिप्स (ब्रिटिश आणि कॉमनवेल्थ इंग्लिश) .

फ्रेंच फ्राईज एकतर मऊ किंवा कुरकुरीत गरमागरम खायला दिले जातात. ते जेवणाचा एक भाग म्हणून किंवा जेवण म्हणून खाल्ले जातात. ते सामान्यतः हॉटेलच्या, फास्ट फूड रेस्टॉरंट्सच्या, पबच्या आणि बारच्या मेनूवर दिसतात. ते सहसा मीठ आणि काळीमिरी घातलून खातात. देशानुसार केचप, व्हिनेगर, मेयोनिज, टोमॅटो सॉस किंवा इतर स्थानिक वैशिष्ट्यांसह खाल्ले जाऊ शकतात. पोटीन किंवा मिरची चीज फ्राइझच्या डिशेसप्रमाणेच, फ्राईज कमी - अधिक प्रमाणात ताटात दिल्या जातात. बटाट्याऐवजी कुमारा किंवा रताळ्यांपासून चिप्स बनवता येतात. याचाच एक भाजलेला प्रकार म्हणजे ओव्हन चीप, हा कमी तेलात किंवा तेल न लावताच बनवला जातो. फ्रेंच फ्राईजचा युरोपमध्ये सापडणारा अतिशय आवडता पदार्थ म्हणजे फिश अँड चिप्स आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →