फ्रेंच गयाना

या विषयावर तज्ञ बना.

फ्रेंच गयाना

फ्रेंच गयाना (फ्रेंच: Guyane) हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेश व विभाग आहे. गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली पोर्तुगीज साम्राज्याने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील पॅरिस येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.

फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना युरोपियन संघ व युरोक्षेत्राचा भाग आहे व येथील चलन युरो हेच आहे. सध्या गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व युरोपाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →