फ्रांसिस्को पिझारो इ गोंझालेझ (स्पॅनिश: Francisco Pizarro y González ;) (इ.स. १४७१ किंवा इ.स. १४७६ - जून २६, इ.स. १५४१) हा स्पॅनिश कॉंकिस्तादोर, इंका साम्राज्य जिंकून घेणारा जेता आणि सध्याच्या पेरूची राजधानी असलेल्या लिमा शहराचा संस्थापक होता.
पिझारोने इ.स. १५२४, इ.स. १५२६ व इ.स. १५३२ साली, अश्या तीन वेळा दक्षिण अमेरिकेत मुलूख धुंडाळायच्या मोहिमा काढल्या. इ.स. १५३३ साली इंकांकडून कुझ्कोचा पाडाव करून त्याने विद्यमान पेरूचा भूप्रदेश जिंकून घेतला. १८ जानेवारी, इ.स. १५३५ रोजी त्याने पेरूच्या किनाऱ्यावर लिम्याची स्थापना केली.
फ्रांसिस्को पिझारो
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.