इक्वेडोर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इक्वेडोर

इक्वेडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Ecuador; अर्थ: विषुववृत्तावरील प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. इक्वेडोरच्या उत्तरेला कोलंबिया, पूर्व व दक्षिणेला पेरू तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत. प्रशांत महासागरामधील गालापागोस द्वीपसमूह इक्वेडोरच्याच अधिपत्याखाली आहे. ब्राझिल देशासोबत सीमा नसणारा इक्वेडोर हा चिली व्यतिरिक्त दक्षिण अमेरिकेतील एकमेव देश आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले कितो हे इक्वेडोरचे राजधानीचे तर ग्वायाकिल हे सर्वात मोठे शहर आहे.

लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →