फोर्स मोटर्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपनी आहे. पुण्यात मुख्यालय असलेली ही कंपनी १९५८ पासून २००५ पर्यंत, कंपनी बजाज टेम्पो मोटर्स म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी बचराज ट्रेडिंग लिमिटेड आणि जर्मनीच्या टेम्पो यांच्यातील संयुक्त उपक्रम होता. ही कंपनी भारतात टेम्पो, मॅटाडोर, मिनीडोर आणि ट्रॅव्हलर सारख्या ब्रँडसाठी ओळखली जाते. गेल्या पाच दशकांमध्ये या कंपनीने डाइमलर, ZF, बॉश, फोक्सवागन सारख्या जागतिक उत्पादकांशी भागीदारी केली आहे.
फोर्स मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्हॅन बनवणारी कंपनी आहे. कंपनी आपल्या वाहनांचे प्रत्येक भाग आपणच तयार करते. कंपनीच्या विक्रेत्यांचे जाळे पूर्ण भारतात आहे. याशिवाय ही कंपनी आफ्रिका, लॅटिन अमेरिका, सार्क आणि आसियान देश, आखाती आणि जर्मनीमधील विविध देशांमध्ये निर्यात करते.
फॉर्च्युन इंडिया ५०० कंपन्यांच्या २०२च्या यादीत फोर्स मोटर्स ३५९व्या क्रमांकावर आहे.
फोर्स मोटर्स
या विषयातील रहस्ये उलगडा.