फोर्स इंडिया

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सहारा फोर्स इंडिया एफ१ हा फॉर्मुला १ मोटार रेसिंग संघ आहे. संघाची स्थापना ऑक्टोबर २००७ मध्ये विजय मल्ल्या आणि मिखाईल मोल यांनी स्पायकर एफ१ संघ ८८ मिलियन युरोला विकत घेतल्या नंतर झाली.

फोर्स इंडिया एफ१ ने २०११ मध्ये दिल्लीत होणाऱ्या पहिल्या भारतीय ग्रांप्री मधील भारताचा फॉर्म्युला वन मधील सहभाग वाढवला. फेडरेशन इंटरनॅशनल डीला अटोमोबाईल ने संघाचे नाव स्पायकर एवेजी फोर्स इंडिया ठेवण्यास २४ ऑक्टोबर २००७ मध्ये परवानगी दिली.

२९ शर्यती गुण न मिळता गेल्या नंतर फोर्स इंडिया ने फॉर्म्युला वन मधील पहिले गुण व टॉप थ्री फिनिश २००९ बेल्जियम ग्रांप्री मध्ये मिळवले जेव्हा जियानकार्लो फिसिकेलाने दुसऱ्या नंबरवर शर्यत संपवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →