फोर्ट्रान सर्वात जुनी म्हणजे १९५७ पासून वापरली जाणारी पहिली उच्चस्तरीय संगणकीय भाषा आहे. आयबीएम या कंपनीने जॉन बॅकस यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम या भाषेचा विकास केला. ही भाषा मुख्यत्वे करून वैज्ञानिक व अभियांत्रिकीच्या कामासाठी वापरली जाते. मूलतः गणितातील आकडेमोड सूत्रे संगणकाच्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी ही भाषा वापरली जाते. यातील सूचना मुख्यतः आउटपुट, इनपुट, आकडेमोड इत्यादी प्रकारच्या असतात.
संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी, प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठराविक क्रमाने, ठराविक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.
प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते. कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages)
उदा. सी, कोबॉल, फोर्ट्रान, बेसिक, एपीएल.
फोर्ट्रान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.