फोर स्ट्रोक इंजिन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

फोर स्ट्रोक इंजिन

दुचाकी गाड्यांमध्ये असणारे पेट्रोलवर चालणारे इंजिन. या दुचाकी गाड्यात पेट्रोलमध्ये वंगण (ऑईल) मिसळावे लागत नाही. यामुळे प्रदुषण काहीसे नियंत्रणात राहते. व जागतिक तापमान वाढही मर्यादीत स्वरूपात होते. पेट्रोलचे प्रमाण टू स्ट्रोक इंजिनच्या प्रमाणात बरेच कमी लागते. आज जगातील बहुतेक वाहने ही ४ स्ट्रोक इंजिनवर चालत आहेत. या इंजिनचे कार्य ४ स्ट्रोक मध्ये चालते. हे चार स्ट्रोक खालीलप्रमाणे

शोषण स्ट्रोक

दाब स्ट्रोक

ज्वलन (ताकद) स्ट्रोक

उत्सर्जन स्ट्रोक



शोषण स्ट्रोक - शोष्ण हे इंजिनमधील पहिली पायरी अथवा स्ट्रोक् आहे. या पायरी मध्ये इंजिनला लागणारे इंधन व ते इंधन ज्वलनासाठी लागणारी हवा इंजिनमध्ये पुरवली जाते. या स्ट्रोकमध्ये पिस्टन क्रॅंकच्या दिशेने जात असते जेणेकरून येणा‍ऱ्या इंधन व हवेसाठी जागा होते व ते शोषले जाते

दाब स्ट्रोक - ही दुसरी पायरी अथवा स्ट्रोक आहे. या स्ट्रोकमध्ये पिस्टन क्रॅंकच्या विरुद्ध दिशेस प्रवास करते जेणेकरून हवा व इंधन यास मिळणारी जागा कमी होते व इंजिनमधील दाब वाढतो.

ज्वलन स्ट्रोक- ही तिसरी व सर्वात महत्त्वाची पायरी अथवा स्ट्रोक आहे. दाब स्ट्रोकामध्ये पिस्टन जेव्हा सर्वात दूरच्या जागेवर पोहोचते त्यावेळेस इंजिनमधील पोकळी सर्वात कमी व दाब सर्वात जास्त असतो. या वेळेस इंधनामध्ये स्पार्क प्लगच्या साहाय्यने ठिणगी उडवली जाते व इंधन जळते. जळणाऱ्या इंधनाचे तापमान वाढून त्याचे प्रसरण होते व त्यासाठी पिस्टनला क्रॅंकच्या दिशेने ढकलले जाते.

उत्सर्जन स्ट्रोक- ही चौथी व शेवटची पायरी आहे. या स्ट्रोकामध्ये पिस्टन पुन्हा क्रॅंकच्या विरुद्ध दिशेस प्रवास करते व इंजिनमधील पोकळी कमी करते परंतु दाब वाढू दिला जात नाही या साठी उत्सर्जन व्हॉल्व उघडला जातो व ज्वलन झालेले वायू इंजिनमधून बाहेर पडतात व इंजिन पुन्हा शोषण स्ट्रोकसाठी तयार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →