फेरमाँट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हि एक आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालविणारी कॅनेडियन कंपनी आहे. सध्या फेरमाँटच्या पुढे दिलेल्या देशांत २२ मालमत्ता आहेत: कॅनडा, युनायटेड स्टेट्स, अझरबैजान, बार्बाडोस, बर्मुडा, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, इजिप्त, जर्मनी, इंडोनेशिया, केन्या, मेक्सिको, मोनॅको, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर, साउथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, तुर्की, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंग्डम, भारत.
कॅनडा मध्ये फेरमाँट त्यांच्या ऐतिहासिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे: विक्टोरिया येथील द एम्प्रेस, वॅनकूवर येथील द हॉटेल वॅनकूवर, कॅल्गरी येथील द पल्लीसेर, एडमंटन येथील हॉटेल मॅकडोनाल्ड, ओटावा येथील शॅट्यु लौरीर, टोरांटो येथील रॉयल यॉर्क, अल्बर्टा येथील बॅंफ स्प्रिंग्स, क्वेबेक येथील शॅट्यु फ्रॅंटेनाच, मॉंट्रियल येथील क्वीन एलिझाबेथ हॉटेल. यांपैकी बहुतांश हॉटेल्स ही कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे आणि कॅनेडियन नॅशनल रेल्वे यांनी १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली होती.
फेरमाँटच्या हॉटेल्समध्ये आणखी इतर काही लक्षणीय हॉटेल्सचा समावेश आहे जसे कि न्यू यॉर्क येथील द प्लाझा, लंडन येथील द स्वोय हॉटेल, शांघाय येथील द पीस हॉटेल, मक्का येथील मक्का क्लॉक रॉयल टॉवर हॉटेल, आणि नुकतेच बनविलेले लॉस ॲंजेल्स येथील सेंचुरी प्लाझा हॉटेल.
फेरमाँट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स
या विषयातील रहस्ये उलगडा.