फॅसिझम

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विसाव्या शतकात उदारमतवादावर दुसरा हल्ला फैसिस्ट विचारप्रणालीने केला. या शतकाच्या पूर्वार्धात इटाली (मुसोलिनी १९२२), जर्मनी (हिटलर १९३३) आणि जपानमध्ये कॅसिस्ट शक्ती सत्तेवर आल्या. १९४३मध्ये अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतील देशातही जनरल पेरॉन याच्या नेतृत्वाखाली असेच सरकार स्थापन झाले. जगातील इतर अनेक देशांतही हुकूमशहा सत्ताधीश राहात आले आहेत. परंतु त्यांच्यात व फॅसिस्ट हुकूमशाहीत फरक केला पाहिजे. जर्मनी, इटाली, इत्यादी देशांतील हुकूमशहा हे जनआंदोलनाच्या लाटेवर आरूढ होऊन सत्तेवर आले होते. सत्तेवर असेतोवर भल्याबुऱ्या सर्व मार्गांनी लोकांचा पाठिंबा राखण्याचा, निदान तो असल्याचा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राही. फेसिस्ट हुकूमशाहीचा उदय झालेले देश हे तुलनेने अधिक प्रगत, औद्योगिक दृष्टचा विकक्षित असे राहिले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी काही प्रमाणात लोकशाही अनुभविली होती, किंबहुना आपल्या पाठीशी असे जनमत उभे करण्यासाठी त्यांनी उद्योगधंदा, तंत्रज्ञान व प्रचारयंत्रणा या सर्वांचा सोयीस्कर उपयोग करून घेतला.

प्रत्यक्षात जर्मनी व जपानमध्ये काही उद्योगपतींनी व लष्करी अधिकाऱ्यांनी फॅसिस्ट सरकारला पाठिंबा दिला असला तरी त्या सरकारांचे मुख्य समर्थक हे तेथील निम्नमध्यम वर्गातील लोक होते. आपली स्थिती सुधारून श्रीमंतवर्गात प्रवेश मिळविण्याची त्यांची आकांक्षा असताना देशातील आर्थिक मंदी व वाढत्या बेकारीमुळे स्थिती खालावून मजूरवर्गात गणना होण्याची त्यांना भीती वाटत होती. सामाजिक ताणतणावामुळे त्यांच्यात नैराश्य व परात्मभावना पसरली होती. अशा वेळेस फॅसिस्ट पक्षाने दिलेल्या आधारामुळे त्यांना जशी आत्मप्रतिष्ठा मिळाली तसे त्या पक्षाच्या प्रचारामुळे त्यांना त्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या शत्रची 'ओळख' पटली. जर्मनीतील ज्यू व इटालीतील साम्यवादी यांच्यावर फॅसिस्टांचा विशेषेकरून रोख होता. या दोन्ही देशांत त्यांचे शिरकाण केले गेले.

फॅसिस्ट विचारसरणीची काही थोडी कल्पना हिटलरच्या आत्मचरित्रातून आणि मुसोलिनीच्या डॉक्टरीन ऑफ कॅसिझम (फॅसिझमचे तत्त्वज्ञान) या पुस्तकातून मिळते. तथापि, त्यांच्या सत्ताकाळातील धोरणातून ती अधिक स्पष्ट होते. फॅसिस्ट हे बुद्धीपेक्षा भावनेला आवाहन करतात. युक्तिवादापेक्षा त्यांना बा व निःशंक आज्ञापालन हवे असते. त्यामुळे अर्थातच लोकशाही अधिक जवळची वाटते. त्याचे एक कारण म्हणजे त्यांना शिस्त

पद्धत त्यांना वर्ज्य वाटते. लोकशाहीस इष्ट वाटणारी स्वातंत्र्य, समता यांसारखी मूल्ये त्यांना तुच्छ वाटतात. अभिजनांचे राज्य असण्यात त्यांना धन्यता वाटते.

फॅसिस्टांची जगात जी अधिक कुप्रसिद्धी झाली ती त्यांच्या हिंसाचार व युद्ध यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे. आपल्या विरोधी असणाऱ्या सर्व गटांची त्यांनी अत्यंत अमानवी पद्धतीने छळणूक केली. जर्मनीत ज्यू लोकांसाठी अनेक छळछावण्या उघडल्या होत्या आणि त्यांतून लाखो ज्यू धर्मीयांना छळ व मृत्यूस सामोरे जावे लागले. जर्मनी, इटली व जपान यांनी शेजारी देशांवर आक्रमण करून युद्ध लादले. युद्धात मनुष्यातील उच्चतम गुण पुढे येतात, असे मुसोलिनीला वाटे. जसे स्त्रीसाठी मातृत्व हा उच्चतम अनुभव आहे तसाच युद्ध हा राष्ट्रासाठी आहे असे तो म्हणतो.

साम्यवादाप्रमाणेच फॅसिझमचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सर्वसत्तावाद, राष्ट्राकडे सर्वंकष सत्ता हवी असा त्यांचा आग्रह असतो. जीवनाच्या सर्व भागांवर नियंत्रण करण्याचा अधिकार राष्ट्राला (म्हणजेच फॅसिस्ट पक्षाला) असला पाहिजे असे फॅसिस्ट मानतात. धर्म, नीतिमत्ता, कला आणि साहित्य, सामाजिक आणि आर्थिक या सर्व क्षेत्रांत राष्ट्राला हस्तक्षेप करण्याचा अधिकार फॅसिस्ट विचारसरणी देते. राष्ट्राहून मोठे व राष्ट्राच्या नियंत्रणापलीकडे काहीही असू शकत नाही असे या विचारसरणीत मानले जाते. आपण श्रेष्ठ वंशाचे वारस आहोत असा दावा जर्मन व जपान-मधील फॅसिस्ट शक्ती करत. जर्मन हे खरे आर्य होत आणि जपानी लोक देवाचे वंशज असा त्यांचा दावा होता. त्यामुळे त्यांच्या असहिष्णुतेला एक वेगळेच परिमाण मिळाले होते. मुसोलिनीलाही रोमन साम्राज्याचे पुनरुज्जीवन करायचे होते. या विचारसरणीतून त्यांनी जगापुढे दुसऱ्या महायुद्धाचे संकट उभे केले. त्यांत त्यांचा पराभव झाला.

फॅसिझम हे २०व्या शतकाच्या सुरुवातीस मध्य-युरोपात ठळकपणे दिसू लागलेले, मूलगामी अधिकारशाही राष्ट्रवादाचे एक रूप आहे. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणाऱ्यांना "फॅसिस्ट" म्हणले जाते. राष्ट्रीय सिंडिकेटवादाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इटलीमध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा उजव्या विचारसरणीच्या भूमिकेचा आणि डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य उदारमतवाद, मार्क्सवाद आणि पारंपरिक पुराणमतवाद ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपरिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते, पण काही समीक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका सर्वंकषसत्तावादी राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. जो पक्ष फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनःस्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल अशा पक्षाची निर्मिती हे फॅसिस्टांचे ध्येय होते. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रती भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि लष्करसत्तावादावर विशेष जोर, वगैरे.. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि साम्राज्यवाद ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.

फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. इटली येथील बेनितो मुसोलिनी आणि जर्मनी येथील अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तिमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुश सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धान्त, संकल्पना आणि संज्ञा हे समाजसत्तावादाकडून उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी वर्गसंघर्षाचा मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि वंशवाद ह्यांना स्वतःचा आधार बनवले. स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधणे ह्या मुख्य उद्देशाने फॅसिस्ट लोक मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थन करतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. असे असले तरी, "फॅसिस्ट" ही संज्ञा राजकीय विरोधकांद्वारे बहुधा तिरस्कारवाचक म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ह्या संज्ञा वापरल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →