फिनिश अथवा सुओमी (फिनिश: suomi) ही फिनलंड देशातील बहुसंख्यांची (इ.स. २००६ सालातील अंदाजानुसार ९२%) भाषा असून फिनलंडाच्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. स्वीडनात हिला अधिकृत अल्पसंख्याक भाषेचा दर्जा आहे. उत्तर युरोपातील इतर देशांमध्येदेखील ही भाषा वापरली जाते. जगभरात एकंदरीत ६० लाख भाषक फिनिश वापरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिनिश भाषा
या विषयातील रहस्ये उलगडा.