फराहबक्ष महाल हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे असलेला महाल आहे. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी ही अष्टकोनी वास्तू आहे. अहिल्यानगरच्या निजामशाहीतील राजा मुर्तझा निजामशाह याने या महालाचे बांधकाम इ.स. १५७६ ते इ.स. १५८३ या काळात करवून घेतले. घुमट, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे. मध्यभागी तसेच चारही बाजूला कारंजी असून त्यासाठी त्याकाळी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फराहबक्ष महाल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.