दारुल उलूम देवबंद या भारतातील मुसरमानांच्या सर्वश्रेष्ठ शैक्षणिक संस्थांपैकी एक असणाऱ्या संस्थेने काढलेले फतवे :
मुसलमान व्यक्तीने कुणाचाही वाढदिवस साजरा करू नये, ते इस्लामविरोधी आहे. त्यामुळे महंमद पैगंबरांचा वाढदिवसही साजरा करणे चुकीचे आहे.
स्त्रियांना तंग कपडे वापरू नयेत, त्यांचे कपडे ढिलेच असले पाहिजेत.
कोणत्याही प्रकारचे गर्भनिरोधक वापरायला इस्लाम परवानगी देत नाही, पण जर काही आरोग्याच्या समस्यांसाठी एखाद्या ॲलोपॅथिक डॉक्टराने सांगितलेच असेल तर त्यासाठी हकिमाच्या सल्ल्याने खातरजमा करून घ्यावी. त्याने सांगितले तरच ते मानावे.
जी कंपनी दारू किंवा व्याजाचे व्यवहार करीत असेल अशा कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार मुसलमानांनी करू नयेत.
मुसलमान स्त्रीने गर्भपात करण्यासाठी हकिमाची अनुज्ञा घेणे बंधनकारक आहे.
इस्लाममध्ये गाईची हत्या करणे पाप आहे.
हातावर गोंदणे आणि अल्कोहोलयुक्त सुगंध वापरणे गैरइस्लामी आहे.
मुस्लिम मुलींनी जीन्स घालू नयेत आणि अंगावर कुठेही गोंदवून घेऊ नये.
वाढदिवसाच्या दिवशी केक कापणे बेकायदेशीर आहे. खरे तर मुसलमानाने वाढदिवस साजरा करताच कामा नये.
फतवा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.