प्लांकचा स्थिरांक

या विषयावर तज्ञ बना.

प्लांकचा स्थिरांक (h), हा पुंजाच्या शक्तीचे (quantum energy चे) कंप्रतेशी गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. पुंज यामिकाच्या सिद्धान्तात या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, पुंजवादाच्या जनकांपैकी एक असलेल्या माक्स प्लांक यांचे नाव या स्थिरांकास दिले आहे. प्लांकच्या स्थिरांकाचा गुणोत्तरदर्शक उपयोग सांगणारे समीकरण पुढीलप्रमाणे आहे:









E

=

h

ν

=

h

ω



/



(

2

π

)

=



ω







{\displaystyle E=h\nu =h\omega /(2\pi )=\hbar \omega \ }





E ही प्रारणातील फोटॉनची पुंजशक्ती (quantized energy) असून, nu(







ν







{\displaystyle \nu \ }



)

ही फोटॉनची हर्‍ट्झमधील कंप्रता आहे, तर omega(







ω







{\displaystyle \omega \ }



)

ही फोटॉनची रेडियन एककातील प्रतिसेकंदकोनीय कंप्रता (angular frequency) आहे.क्रॉस्ड h डिरॅकचा स्थिरांक आहे. त्याची किंमत















{\displaystyle \hbar \ }



= १.०५४५७ X १०^(-)३४ ज्यूलसेकंद इतकी आहे.

प्लांकच्या स्थिरांकाची किंमत h = ६.६२६ X १० ^(-)३४ ज्यूलसेकंद.

प्लांकच्या स्थिरांकाच्या आणखी काही सोप्या व्याख्या: १. फॉटॉन(प्रकाशपुंज)च्या ऊर्जेचा, त्या फॉटॉनच्या वारंवारतेशी असणाऱ्या गुणोत्तराचा स्थिरांक.

२. रेडियेशनच्या एकापुंजाचे त्याच्या वारंवारतेशी असणारे न बदलणारे गुणोत्तर.

३. विद्युत्-चुंबकीय तरंगाची कंप्रता आणि तिच्यातली ऊर्जा यांचा गणिती संबंध दाखवणारा स्थिरांक.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →