२०१४ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा पहिला हंगाम २६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान खेळवण्यात आला. ह्या हंगामात दुहेरी साखळी सामान्यांशिवाय, दोन उपांत्य फेरी सामने, तिसऱ्या स्थानासाठी सामना व अंतिम सामना होता. पहिल्या फेरीत ५६ सामने तर बाद फेरीत ४ सामने असे एकून ६० सामने खेळविण्यात आले. पहिल्या हंगामात ८ संघ सहभागी झाले. पहिला सामना दबंग दिल्ली आणि बंगळूर बुल्स यांच्या दरम्यान २६ जुलै रोजी खेळविला गेला तर अंतिम सामना सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई येथे ३१ ऑगस्ट रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स ह्या संघांंदरम्यान पार पडला. जयपूर पिंक पँथर्स संघाने यू मुम्बाचा ३५-२४ असा पराभव करून पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रो कबड्डी लीग, २०१४
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.