मुन्शी प्रेमचंद (जन्म : वाराणसी, ३१ जुलै १८८० - ८ ऑक्टोबर १९३६) हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क'मध्ये ८ ऑक्टोबर १९०३पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रेमचंद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?