गीतांजली श्री

या विषयावर तज्ञ बना.

गीतांजली श्री

गीतांजली श्री (जन्म: १२ जून १९५७) उर्फ गीतांजली पांडे या नवी दिल्ली, भारत येथे राहणाऱ्या एक हिंदी कादंबरीकार आणि लघु-कथा लेखिका आहेत. त्यांनी अनेक लघुकथा आणि पाच कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी २००० साली लिहिलेली कादंबरी माई २००१ मध्ये क्रॉसवर्ड बुक अवॉर्डसाठी निवडली गेली आणि नीता कुमार यांनी केलेला या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद २०१७ मध्ये नियोगी बुक्सने प्रकाशित केला.

२०२२ मध्ये, डेझी रॉकवेल यांनी टोम्ब ऑफ सॅन्ड या नावाने इंग्रजीत अनुवादित केलेल्या गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत. काल्पनिक कथांव्यतिरिक्त त्यांनी प्रेमचंद यांच्यावर समीक्षात्मक लेखन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →