प्रश्नोपनिषद हे उपनिषदअथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. पिप्पलाद ऋषींनी सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.
या उपनिषदाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी 'ब्राह्मण'च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. पिप्पलाद त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:
सुकेशा - भारद्वाज कुळातील एक ऋषी
सत्यकाम शिबीकुमार - ऋषी
सौर्यायणी - गर्ग कुळातील एक ऋषी
आश्वलायन कोसल देशाचा एक ऋषी
भार्गव विदर्भ निवासी असा एक ऋषी
कबन्धी कत्यऋषीचा प्रपौत्र
या लेखाचा ज्ञानकोशीय विस्तार येथे करा. मराठी अर्थासहीत मूळग्रंथ मजकूरासाठी मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडे जावे.
आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: प्रश्नोपनिषद हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:प्रश्नोपनिषद येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.
प्रश्नोपनिषद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?