प्रभू भोजन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्रभू भोजन

ख्रिस्ताच्या जीवनाच्या अंतिम रात्री येशू ख्रिस्ताने आपल्या १२ शिष्यांसमवेत अंतिम भोजन घेतले. या प्रसंगी ख्रिस्ताने हातात भाकरी घेऊन मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊ केली तसेच द्राक्षरस भरलेला प्याला आपण पिऊन इतर शिष्यानाही देऊ केला. ख्रिस्ताने शिष्यांना म्हणले की ही भाकरी म्हणजे माझे शरीर आहे आणि हा द्राक्षरस म्हणजे माझे रक्त. या जेवणानंतर प्रभू येशूस रोमन सैनिकांनी पकडून नेले व सुळावर चढवले.

ख्रिस्ती धर्मीय लोक या प्रसंगाची आणि ख्रिस्ताने आपल्या सारख्या (?) पापी लोकांसाठी प्राणाचे बलिदान केल्याची आठवण म्हणून प्रभू भोजनाचा विधी अजूनही पाळतात. या प्रसंगी चर्चमधील धर्मगुरू / पाळक जमलेल्या भाविकांस भाकरीचा (यासाठी एक प्रकारचा वेफर वापरला जातो) तुकडा आणि द्राक्षरस (वाईन नव्हे) देतात. अनेकदा रोग्यांना बरे वाटावे म्हणूनही हा उपचार केला जातो.

ख्रिस्ताच्या जन्म, मरण, शिकवण यांची माहिती देणाऱ्या नव्या करारात या प्रसंगाचे उल्लेख खालीलप्रमाणे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →