गुड फ्रायडे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गुड फ्रायडे

गूड फ्रायडे याला (पवित्र शुक्रवार Holy Friday /काळा शुक्रवार Black Friday/महा शुक्रवार Great Friday) असेही म्हणतात. हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे ; येशूच्या वधस्तंभावर चढवलेल्या आणि कॅलव्हरी किंवा गोलगोथा येथे त्याच्या मृत्युचे स्मरण करणारा ख्रिश्चन पवित्र दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दुःखवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →