प्रकाश त्रिभुवन (१४ जून १९५४) हे मराठीतील लेखक, दिग्दर्शक आणि आंबेडकरवादी विचारवंत आहेत. महाराष्ट्रातील " दलित साहित्यिक चळवळ" चे ते अग्रगण्य आहेत. प्रकाश त्रिभुवन यांनी लिहिलेले नाटक “थांबा, रामराज्य येतेय!” दलित रंगभूमी चळवळीतील मैलाचा दगड आहे. प्रकाश त्रिभुवन यांच्या “थांबा, रामराज्य येतेय!” या नाटकाचा उल्लेख मराठी विश्वकोश खंड १५ मधील "वग" या लेखात आहे.“थांबा, रामराज्य येतेय!” ५०० वेळा विविध नाट्यगृहात सादर केले आहे. प्रसिद्ध फ्रेंच लेखक दिग्दर्शक प्रीटर ब्रूक यांनी "थांबा, रामराज्य येतेय!" चा गौरव केला आहे. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या महाराष्ट्र शासन निर्मित महाराष्ट्राच्या माहितीपटात "थांबा, रामराज्य येतेय!" चा समाविष्ट आहे. "थांबा, रामराज्य येतेय!" ला कामगार कल्याण विभाग आणि महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कृत केले गेले आहे. “थांबा, रामराज्य येतेय!” आणि "गणनायिका आम्रपाली" या नाटकांचा विविध विद्यापीठ अभ्यासक्रमात समविष्ट केलेलं आहे. "थांबा, रामराज्य येतेय!" नाटकाचा हिंदीत ही अनुवाद झाला आहे. यांनी "थांबा, रामराज्य येतेय!" यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या नामांतर लढ्याची पाश्वभूमी आहे. प्रकाश त्रिभुवन हे नामांतर लढ्यात सहभागी होते तसेच दलित आंदोलनातही प्रकाश त्रिभुवन सक्रिय आहेत. अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचं अकरावं दोन दिवसीय अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभुवन यांनी भूषविले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रकाश त्रिभुवन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?