डाॅ. प्रकाश जोशी हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी गणितात डाॅक्टरेट मिळवली आहे. ते मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात ते काम करत होते. जोशी अँटार्क्टिका, परिभ्रमण, निसर्ग, नकाशा, वास्तुरचना, गणित, तत्त्वज्ञान, पर्यावरण-शेती पासून ते ललित-विनोदी कथांपर्यंतच्या विषयांवर लिखाण करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून जोशी यांचे ६०हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. जत्रा, दैवज्ञश्री, मेनका, ललना, वसंतश्री आदी दिवाळी अंकांतून त्यांच्या ४०-४५ विनोदी कथा छापून आल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रकाश जोशी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.