अफोन्सो सहावा (पोर्तुगीज उच्चार: [ɐˈfõsu]; २१ ऑगस्ट, १६४३ – १२ सप्टेंबर, १६८३) हा १६५६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालचा राजा होता. हा ब्रगांझा वंशाचा दुसरा राजा होता. तेराव्या वर्षी सिंहासनावर बसलेल्या अफोन्सोने थेट राज्य कमी काळ केले. सुरुवातीस त्याची आई, लुइसा दे गुझमान हिने १६६२ पर्यंत राज्यकारभार पाहिला. तिला ख्रिश्चन मठात घालवून दिल्यानंतर त्याने लुइस दे व्हॅस्कोन्सेलोल इ सूसा याच्या मदतीने राज्य चालविले
अफोन्सोच्या कारकिर्दीत स्पेनने पोर्तुगालचे स्वातंत्र्य मान्य केले. यामुळे त्याला विजयी असे संबोधले जायचे. अफोन्सो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल होता. १६६८ मध्ये त्याचा भाऊ दुसरा पेद्रो याने अफोन्सोला राज्य करण्यास अक्षम ठरवून पदच्युत करण्याचा कट रचला आणि कारभार आपल्या हाती घेतला. यानंतर नाममात्र का होईना अफोन्सोच्या नावाने द्वाही फिरत असे. अफोन्सोची पत्नी राणी मरिया फ्रान्सिस्का हिने अफोन्सोशी झालेले लग्न रद्द करून घेतले व नंतर पेद्रोशी लग्न केले. अफोंसोने आपले उत्तर आयुष्य आण राज्यकाल बंदिवासात असल्यासारखा घालवला..
पोर्तुगालचा सहावा अफोन्सो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!