पेराग्वे नदी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पेराग्वे नदी

पेराग्वे नदी (पोर्तुगीज: Rio Paraguai, स्पॅनिश: Río Paraguay, ग्वारानी: Ysyry Paraguái) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी ब्राझिल देशाच्या मातो ग्रोसो राज्यामध्ये उगम पावते व साधारण दक्षिण दिशेला वाहते. बोलिव्हिया व पेराग्वे देशांमधून वाहत जाऊन पेराग्वे नदी पेराग्वे-आर्जेन्टिना आंतरराष्ट्रीय सीमेवर पाराना नदीला मिळते.

पेराग्वेची राजधानी आसुन्सियोन हे पेराग्वे नदीवर वसलेले सर्वात मोठे शहर आहे. पेराग्वे नदी सपाट प्रदेशामधून वाहत असल्यामुळे जलवाहतुकीसाठी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →