पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की (रशियन: Петропавловск-Камчатский) हे रशिया देशाच्या कामचत्का क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. आहे. पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहर रशियाच्या अतिपूर्व भागात सायबेरियामधील कामचत्का द्वीपकल्पावर वसले असून ते मॉस्कोपासून ६७६६ किमी तर व्लादिवोस्तॉकपासून २२२० किमी अंतरावर स्थित आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे १.७९ लाख होती.
पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरापर्यंत पोचण्यासाठी केवळ हवाई वाहतूकच उपलब्ध आहे. रशियाच्या इतर भागांतून येथे रस्ते अथवा रेल्वेमार्ग नाहीत. समुद्रकाठाच्या जवळ असल्यामुळे येथील हवामान सायबेरियाच्या तुलनेत सौम्य आहे.
पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?