पृथ्वीगीर हरिगीर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी (जन्म : यवतमाळ, इ.स. १८७६; - १४ मार्च, इ.स. १९३१) हे एक मराठी पत्रकार, ज्ञाति-इतिहास संशोधक आणि लेखक-संपादक होते. ते पृथ्वीगीर हरिगीर या नावाने लिखाण करीत असत.

पृथ्वीगीर हरिगीर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ‘हरिकिशोर’ या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या लिखाणामुळे ब्रिटिश आमदानीत त्यांच्यावर खटला भरला गेला, आणि त्यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →