पूर्व स्लावी भाषा या स्लावी भाषांच्या तीन प्रादेशिक समूहांपैकी एक आहेत, ज्या पश्चिमआणि दक्षिण स्लावी भाषांपेक्षा वेगळ्या आहेत. पूर्व स्लावी भाषा सध्या संपूर्ण पूर्व युरोपमध्ये आणि पूर्वेकडे सायबेरियातील व रूसी सुदूर पूर्वेपर्यंत मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. रूसी साम्राज्य आणि सोव्हिएत संघाच्या मोठ्या ऐतिहासिक प्रभावामुळे, कॉकेशस आणि मध्य आशियातील अनेक प्रदेशांमध्ये रूसी भाषा देखील संपर्क भाषा म्हणून बोलली जाते. तीन स्लावी शाखांपैकी, पूर्व स्लावी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, आणि तिच्या मातृभाषिकांची संख्या पश्चिम आणि दक्षिण शाखांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे.
सर्वसाधारण मत असे आहे की बेलारूसी, रूसी आणि उक्रेनी या अस्तित्वात असलेल्या पूर्व स्लावी भाषा आहेत. काही भाषाशास्त्रज्ञ रुसिन भाषेला एक वेगळी भाषा देखील मानतात, जरी कधीकधी ती उक्रेनीची बोलीभाषा मानली जाते.
आजचे पूर्व स्लावी भाषांचा उगम ९व्या ते १३व्या शतकापर्यंत क्यीवी रुसमध्ये बोलल्या जाणाऱ्या एका सामान्य पूर्वज भाषेतून झाला आहे, जी नंतर द्नीपर नदीच्या खोऱ्यातील ल्येतुवी महाराज्याचे भाषा असलेल्या रुथेनीमध्ये आणि वोल्गा नदीच्या खोऱ्यातील मध्ययुगीन रूसीमध्ये विकसित झाली, जी मॉस्कोचे महाराज्याचा समावेश असलेल्या रूसी संस्थानांची भाषा होती.
या सर्व भाषा सिरिलिक लिपी वापरतात, परंतु विशिष्ट बदलांसह. रुथेनीच्या वंशज असलेल्या बेलारूसी आणि उक्रेनी भाषांमध्ये लातीन-आधारित वर्णमाला वापरण्याची परंपरा आहे — अनुक्रमे बेलारूसी लात्सिंका आणि उक्रयिंस्क लतिनित्स्य वर्णमाला (तसेच रुसिन काही प्रदेशांमध्ये लातीन वापरते, उदा. स्लोव्हाकियातील ).
पूर्व स्लावी भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?