पुनर्वा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पुनर्वा

पुनर्वा किंवा चेना (द्विनाम: पॅनिकम मिलियासियम) हे एक भरड धान्य आहे. याची काही सामान्य नावे पुढील प्रमाणे आहेत: प्रोसो मिलेट, ब्रूमकॉर्न मिलेट, कॉमन मिलेट, हॉग मिलेट, कश्फी मिलेट, रेड मिलेट आणि व्हाईट मिलेट. पुरातत्वीय वनस्पतीशास्त्रीय पुराव्यांवरून असे दिसून येते की हे भरड धान्य प्रथम उत्तर चीनमध्ये सुमारे १०,००० वर्षांपूर्वी पिकवण्यात आले होते. याची प्रमुख लागवड उत्तर चीन, भारतातील हिमाचल प्रदेश, नेपाळ, रशिया, युक्रेन, बेलारूस, मध्य पूर्व, तुर्की, रोमानिया आणि अमेरिकेतील ग्रेट प्लेन्स राज्ये इत्यादी देशांमध्ये केली जाते. या पिकाची दरवर्षी सुमारे ५,००,००० एकर (२,००,००० हेक्टर) लागवड केली जाते. हे पीक अल्प मुदतीचे असून याच्या काही जाती लागवडीनंतर केवळ ६० दिवसांत काढणीस येतात. याला पाण्याची फारशी आवश्यकता नसून, कमी आर्द्रते मध्ये देखील अधिक धान्य उत्पादन प्राप्त होते.



या पिकावर हल्ला करणारे रोग आणि कीटक हे अल्प प्रमाणात असून ते फारसे हानिकारक देखील नाहीत. या पिकाची केवळ तण हीच एक मोठी समस्या आहे. या पिकाच्या बाल्यावस्थेतील विकासाचा टप्पा फार महत्वाचा आहे. दाण्यांची निर्मिती ३ ते ५ पानांच्या अवस्थेत होते. त्यानंतर, याच्या उत्पादनासाठी सर्व पोषक तत्व उपलब्ध व्हावी म्हणून तणांची वाढ रोखली जाते. पारंपारिक शेतीमध्ये, तणनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये, हात खुरपे, सायकल खुरपे किंवा इतर कल्टिव्हेटरचा वापर करता येतो. चांगल्या पिकाच्या विकासासाठी, ५० ते ७५ किलोग्रॅम प्रति हेक्टर नायट्रोजनची शिफारस केली जाते. मक्यानंतर लगेच या पिकाची लागवड करणे टाळावे. कारण या दोन्ही पिकातील तण हे एक सारख्याच प्रजातीचे असतात. ज्यामुळे तण वाढीची गंभीर निर्माण होऊ शकते. हे

पीक विनासायास आणि कमी पाण्यात येत असल्याने रब्बीत याची लागवड सहज सोपी ठरते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →