पार्श्वनाथ अनंत आळतेकर (१४ सप्टेंबर, इ.स. १८९८ - २२ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यसंस्था स्थापक आणि चालक होते.
आळतेकरांचे बालपण आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांचे काका त्यांना कोल्हापुरात होणाऱ्या प्रत्येक नाटकाला घेऊन जात, त्यामुळे पार्श्वनाथानांही नाटकाचे वेड लागले, आणि ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले. कॉलेजात असताना ’हाच मुलाचा बाप’ या नाटकातील नायकाच्या भूमिकेसह आळतेकरांनी गडकऱ्यांच्या एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास या नाटकांचे दिग्दर्शनही केले.
पुढे कायद्याच्या शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर पार्ष्वनाथ आळतेकरांना चरितार्थासाठी ’मॅजेस्टिक फिल्म कंपनी’त नोकरी सुरू केली. तिथेच त्यांनी पृथ्वीवल्लभ आदी सिनेमांतून भूमिका केल्या. वासवदत्ता आदी हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनांखेरीज एका कानडी आणि दोन तामिळ चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.
उडती पाखरे आदी नाटके नव्या तंत्राने रंगभूमीवर आणून रंगभूमीला प्रशिक्षित दिशा देण्याचा प्रयत्न पार्श्वनाथ आळतेकरांनी केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रंगभूमीला राजाश्रय मिळा्वा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. रंगभूमीचा वनवास संपला पाहिजे आणि नाट्यकलेचा जीवनासाठी उपयोग झाला पाहिजे, असे ते सतत म्हणत, आणि त्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
पार्श्वनाथ आळतेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.