पारनेर विधानसभा मतदारसंघ - २२४ (Parner Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार पारनेर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. पारनेर तालुका आणि २. अहमदनगर तालुक्यातील नाळेगांव आणि चास ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. पारनेर हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निलेश ज्ञानदेव लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.