पानवेल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पानवेल

पानवेल (नागवेल, नागवल्ली, म. हिं. गु.: पानवेल,पान क.: यल्ली बळ्ळी सं.: नागवल्ली, तांबूली इं.: बीटल व्हाइन, बीटल पेप्पर लॅ.: पायपर बीटल; कुल-पायपरेसी) ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हिच्या पानांपासून विडे करतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही एक लागवडयोग्य वेल आहे. याचे पान विडा करण्यासाठी वापरतात. भोजनोत्तर विडा खाल्याने भोजनाचे निट पचन होते.विडा करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे.

पानांचा मुख्य उपयोग तांबुलाकरिता असल्याने त्याकरिता फक्त नर वेलीची लागवड विशेषेकरून करतात. पाने सुगंधी, पाचक, वायुनाशी व उत्तेजक असून पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल जंतुनाशक असते. तहान शमविण्यासाठी व मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यास पानांचा रस उपयुक्त असतो. डोके दुखत असल्यास व रातांधळेपणात पानांचा रस वापरतात. फळे मधाबरोबर कफ विकारांत देतात. पाने फुप्फुसाच्या विकारांतही गुणकारी असून गळू व सूज यांवर त्यांचे पोटीस बांधतात. विड्याचे पान हे विशेषकरून जड अथवा पोटभर जेवणा नंतर खायला हवे. अधिक पान खाणे हानिकारक असल्याचे आढळले आहे. काळ्या मिरीबरोबर नागवेलीच्या कोवळ्या मुळांचे चूर्ण घेतल्याने स्त्रियांना गर्भधारणा टाळणे शक्य असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →