पाथर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव राजापूर तालुक्यातील कोडवली, हर्डी, केळवडे या गावा दरम्यान वसले असून, मराठी ही येथील लोकांची बोली भाषा आहे.
मुख्यत: कुणबी बहुसंख्य असलेल्या या गावात कुणबी समाजा बरोबर ब्राम्हण, गुरव, धनगर या समाजाचे लोकही येथे गुण्या गोविंदानी राहतात
या लोकांचे मुख्य अन्न भात असून या बरोबरच वरी, बाजरी, नाचणी आणि कुळीद हेही आहारात असतात. उभय आहारी असलेल्या या लोकांत मच्ची आणि मटण ही तेवढ्याच आवडीने खाल्ले जाते
गणपती, होळी, शिमगा, नवरात्री हे या लोकांचे मुख्य सण असून या बरोबर इतरही पारंपरिक धार्मिक सण मोठया उत्साहात साजरे होतात.
भातशेती हे येथील मुख्य व्यवसाय होता, पण आता या गावातील तरुण पिढी शिक्षित होऊन मुंबई, रत्नागिरी पुणे या सारख्या शहरांत स्थलांतरित झाल्याने भातशेती ओस पडली आणि त्या जागी हापूस काजू या सारखी पिके दिसू लागली आहेत.धान
धांगट वाडी, भरडवाडी, निवयवाडी, किंजलवाडी, आगरवाडी आणि धनगरवाडा अशा सहा वाड्यात हे गाव विभागले आहे. दुर्गादेवी, ब्राह्मण देव आणि बालेश्वर ही गावाची प्रमुख देव स्था ने असून पारंपरिक कुलाचार प्रमाणे येथे देवाचे उत्सव आणी पूजा होतात.
पाथर्डे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.