पांडुरंग दत्ताराम राऊत (१३ जुलै १९४६ – ३ ऑक्टोबर २०२२) हे एक भारतीय राजकारणी, गोवा प्रजा पक्षाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष होते. राऊत हे डिचोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गोवा विधानसभेचे दोन वेळा सदस्य होते. त्यांनी विधानसभेच्या १९८९ निवडणूक आणि १९९९ निवडणूक ह्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकीटावर जिंकल्या. त्यांनी फेब्रुवारी १९९१ ते एप्रिल १९९४ पर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले.
त्यांनी अपक्ष (१९९४), गोवा प्रजा पक्ष (२०१७) आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (२०१२) मधून देखील निवडणूका लढवल्या; पण अयशस्वी ठरले.
राऊत यांचा जन्म १३ जुलै १९४६ रोजी पोर्तुगीज साम्राज्यादरम्यान पोर्तुगीज भारतातील गोव्यातील डिचोली येथे झाला. त्यांचे लग्न विलासिनी यांच्याशी झाले होते. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी, वयाच्या ७६ व्या वर्षी, अल्प आजाराने राऊत यांचे निधन झाले. डिचोलीमधील त्यांच्या मूळ गावी, साल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पांडुरंग राऊत
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.