सुरेश कुसो आमोणकर (१५ मे १९५२ - ६ जुलै २०२०) हे गोव्या राज्यातील भारतीय राजकारणी आणि वैद्यकीय व्यवसायी होते.
ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून १९९९ आणि २००२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत पाले मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून आले. ते १९९९ ते २००० पर्यंत फ्रांसिस्को सार्डिन्हा यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य, सामाजिक कल्याण आणि कामगार व रोजगार मंत्री होते. त्यानंतर पहिल्या मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळात ते आरोग्य, कामगार व रोजगार आणि कारखाने व बॉयलर मंत्री होते.
अमोनकर २००७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गुरुदास गौन्स यांच्याकडून पराभूत झाले. गुरुदास गौन्स यांच्या मृत्यूनंतर २००८ च्या पोटनिवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले कारण पक्षाने युवा नेते प्रमोद सावंत यांना तिकीट दिले होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये ते बंडखोर आरएसएस नेते सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचमध्ये सामील झाले आणि २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांना सांखळीची जागा देण्यात आली, जिथे त्यांना ३,८३१ मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आले.
भारतात कोविड-१९ महामारीच्या काळात ६ जुलै २०२० रोजी अमोणकर यांचे कोविड-१९ मुळे निधन झाले.
सुरेश आमोणकर (राजकारणी)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.