पर्वतरांग हा एकसारखे अनेक पर्वत अथवा डोंगर असलेला एक भौगोलिक प्रदेश आहे. पर्वतरांगेमध्ये भूगर्भशास्त्रानुसार समान गुणधर्म असलेले पर्वत असतात.
जगातील सर्वात उंच पर्वतरांगा आशिया खंडामध्ये आहेत.
हिमालय: भारत, चीन, नेपाळ, पाकिस्तान, भूतान; सर्वोच्च शिखर - एव्हरेस्ट, 8848 मी
काराकोरम पर्वतरांग: पाकिस्तान, भारत, चीन; सर्वोच्च शिखर - के२, 8611 मी
हिंदुकुश पर्वतरांग: अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत; सर्वोच्च शिखर - तिरिच मीर, 7708 मी
पामीर पर्वतरांग: ताजिकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत; सर्वोच्च शिखर - इस्माइल सोमोनी शिखर, 7495 मी
थ्यॅन षान: चीन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, भारत, पाकिस्तान; सर्वोच्च शिखर - चंगीश चोकुसू, 7439 मी
अमेरिका खंडामधील खालील दोन जगातील सर्वात लांबीच्या पर्वतरांगा आहेत.
आन्देस - ७,००० किमी
रॉकी पर्वतरांग - ४,८०० किमी
पर्वतरांग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?