परझानिया हा २००७ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे जो राहुल ढोलकिया यांनी सह-लेखन आणि दिग्दर्शित केला आहे; डेव्हिड एन. डोनिह्यू हे दुसरे सह-लेखक आहेत. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि सारिका यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या, तर कोरिन नेमेक आणि राज झुत्शी यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या. ७००,००० अमेरिकन डॉलर्सच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये चित्रित करण्यात आला होता.
हा चित्रपट दहा वर्षांच्या पारशी मुलागा अझहर मोदीच्या सत्य कथेवर आधारित आहे. चित्रपटात ह्या मुलाचे नाव परजान पिठावाला आहे जो २८ फेब्रुवारी २००२ रोजी गुलबर्ग सोसायटी हत्याकांडानंतर गायब होतो, ज्यामध्ये ६९ लोक मारले गेले होते आणि २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींमधील अनेक घटनांपैकी ही एक घटना होती. हा चित्रपट पिठावाला कुटुंबाचा त्यांच्या हरवलेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करतानाचा प्रवास दाखवतो.
२६ नोव्हेंबर २००५ रोजी गोव्यात झालेल्या ३६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि २६ जानेवारी २००७ रोजी देशभरात प्रदर्शित झाला.
परझानिया
या विषयावर तज्ञ बना.