पमुला पुष्पा श्रीवानी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पमुला पुष्पा श्रीवानी

पमुला पुष्पा श्रीवानी (जन्म २२ जून १९८६) ह्या एक भारतीय राजकारणी आहे ज्यांनी ८ जून २०१९ ते ७ एप्रिल २०२२ पर्यंत आंध्र प्रदेशच्या ११ व्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. सोबतच त्या आदिवासी कल्याण विभागाच्या मंत्री पण होत्या. त्या कुरुपम मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभेच्या सदस्या आहेत. त्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत.

जून २०१९ मध्ये, त्यां वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील आंध्र प्रदेशच्या पाच उपमुख्यमंत्र्यांपैकी एक बनल्या आणि त्यांना आदिवासी कल्याण मंत्रीपदही देण्यात आले.

२०१४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीत त्यांना ५५,४३५ मते मिळाली (४२.३%). २०१९ च्या निवडणूकीत त्यांना अजून मते मिळाली (७४,५२७ मते - ५३.७%).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →