पद्मा सचदेव (१७ एप्रिल १९४० - ४ ऑगस्ट २०२१) एक भारतीय कवयित्री आणि कादंबरीकार होत्या. डोग्री भाषेतील त्या पहिल्या आधुनिक महिला कवयित्री होत्या. त्यांनी हिंदीतही लिखाण केले. त्यांनी अनेक कविता संग्रह प्रकाशित केले, ज्यात मेरी कविता मेरे गीत यांचा समावेश आहे, ज्याला १९७१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांना २००१ मध्ये पद्मश्री मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान (२००७-०८), २०१५ मध्ये सरस्वती सन्मान, व २०१९ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मा सचदेव
थोडक्यात पण महत्त्वाचे.