पंढरपूर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.
विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र असल्याने हे स्थानक नेहमी व्यस्त असते. पंढरपूरच्या वाऱ्यांसाठीही अनेक विशेष गाड्या सुरू कराव्या लागतात. मुंबई आणि सातारा यांना जोडणारी सातारा - दादर एक्स्प्रेस ही गाडी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊनच सुरू करण्यात आली होती. इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांनी हे स्थानक पंढरपूरला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांशी जोडते.
पंढरपूर रेल्वे स्थानक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.