पंचतंत्र

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पंचतंत्र (फारसीमध्ये कलीलेह ओ देम्नेह, अरबीमध्ये कलीलाह व दिम्नाह) संस्कृत व पाली भाषांतील प्राण्यांच्या बोधकथांचे संकलन आहे.

मूळ संस्कृत भाषेत असलेल्या पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णू शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्रभेद, मित्रसम्प्राप्ति, काकोलूकीयम्, लब्धप्रणाश आणि अपरीक्षितकारकम् असे पाच भाग असून त्यांत पशु-पक्षांच्या रूपकांतून माणसाला व्यवहार चातुर्य शिकवले आहे.

एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा ’महिलारोप्य’वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख आणि व्यवहारशून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व त्याने तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहारकुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा उचलला. विष्णू शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र. पंचतंत्र या नीतिकथा आहेत. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धूर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे.

या नीतिकथांची मूळ कल्पना ऋग्वेदातील मंडूक सूक्तात आहे. मंडुकांना (बेडकांना) विनोदाने 'ब्राह्मणा व्रतचारिणः' म्हणले आहे. तशीच तेथे एक मनुष्य व मासा यांची कथा येते. छांदोग्य उपनिषदात सत्यकाम जाबालाने पशुपक्ष्यांपासून उपदेश घेतला अशी माहिती मिळते.

सर्व कथा पाच तंत्रांत विभागल्या आहेत,

१.मित्रभेद - मित्रांमधील वादविवाद, मतभेद

२.मित्रलाभ - मित्रप्राप्ती आणि त्याचे लाभ

३.संधि- विग्रह / काकोलुकीयम - कावळे आणि घुबडांच्या कहाण्या

४.लब्ध प्रणाश - हातात असलेली वस्तू हातातून निसटते.

५.अपरीक्षितकारकम् - पारख केल्याशिवाय काहीही करू नका.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →