न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५

या विषयातील रहस्ये उलगडा.

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता. मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले. २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली.

फोबी लिचफिल्डने नाबाद ६४ धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिला टी२०आ सामना पाच गडी राखून जिंकला. अमेलिया केरने चार बळी घेतल्यानंतरही, यजमानांनी दुसरा टी२०आ २९ धावांनी जिंकला, ॲशले गार्डनरने ४ षटकात तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने तिसरा आणि शेवटचा टी२०आ सामना पाच गडी राखून जिंकला आणि मालिका ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →