न्यू झीलंड पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मार्च २०२३ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले. याआधी केवळ १९९६ विश्वचषकात न्यू झीलंडने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळला होता.
न्यू झीलंडने पहिला टी२०आ १९ धावांनी जिंकला, त्यानंतर दुसऱ्या टी२०आ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने न्यू झीलंडचा पराभव केला. न्यू झीलंडवर संयुक्त अरब अमिरातीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विजय आणि सहयोगी संघाविरुद्ध न्यू झीलंडचा पहिला पराभव होता. न्यू झीलंडने मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिका २-१ ने जिंकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.