नोकिया ८८००

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नोकिया ८८०० (उच्चारण: एटी-एट-हंड्रेड) हा नोकिया कंपनीने उत्पादित केलेला एक वैभवी (लक्झरी) मोबाईल फोन होता. हा फोन नोकियाच्या सिरीझ ४० (Series 40) या प्रचालन यंत्रणेवर (ऑपरेटिंग सिस्टम) आधारित होता. यात स्टेनलेस स्टीलचे कवच आणि ओरखडे प्रतिरोधक पडदा वापरण्यात आला होता. या फोनचे एकूण वजन १३४ ग्रॅम होते.

या फोनची सरकवून उघडण्याची यंत्रणा अतिशय प्रगत होती. यासाठी उच्च-कार्यक्षमतेच्या कार्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉल बेरिंगचा वापर करण्यात आला होता. नोकिया ८८०० हा फोन पहिल्यांदा ७ एप्रिल २००५ रोजी प्रदर्शित झाला आणि ऑक्टोबर २००५ मध्ये तो व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →