नैरोबी माशी किंवा ड्रॅगन किडा हा एक मूळचा पूर्व आफ्रिकेतील पेडेरस या वंशातील रोव्ह बीटलच्या दोन प्रजातींचे सामान्य नाव असलेला 'संधीपाद' संघातील उडणारा कीटक आहे. सध्या हा भारत आणि भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. या किटकात पेडेरिन नावाचा संक्षारक पदार्थ असतो, जो त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचा दाह होऊ शकतो. या जळजळत्या वेदनेमुळे, नैरोबी माशीला कधीकधी "ड्रॅगन किडा" असे देखील म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नैरोबी माशी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?