नैऋत्य गारो हिल्स जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नैऋत्य गारो हिल्स जिल्हा

नैऋत्य गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यापासून नैऋत्य गारो हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. नैऋत्य गारो हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिम व दक्षिणेस बांगलादेशचे रंगपूर व मयमनसिंह हे विभाग आहेत. २०११ साली नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.७ लाख इतकी होती. अंपती नावाचे नगर नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी गारो जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. गारो ही येथील प्र्मुख भाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →