नेत्रा सदाशिव साठे (जन्म : ३१ मे १९३७; मृत्यू : कल्याण, २३ ऑगस्ट २०१४) या एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार होत्या. त्यांनी १९५५ मध्ये मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून DTC आणि १९५९ मध्ये Painting Advance हे अभ्यासक्रम पुरे केले होते.
नेत्रा साठे यांचे वडील कृष्णराव केतकर हे स्मारक-शिल्पे बनवीत. शिल्पाकृतींची सरकारी कामे मिळविण्यासाठी त्यांना दिल्लीत राहणे गरजेचे होते. त्यांचा स्टुडिओ कल्याणमध्ये व फाउंडरी डोंबिवलीत होती.
नेत्राच्या आईने कन्येला संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, साहित्य या सगळ्यांचीच गोडी लावली. लग्नाअगोदर मुंबईत असताना नेत्रा संस्कृत नाटकांतून अभिनय करीत असत. अभिज्ञान शाकुंतल आणि मृच्छकटिकम् या नाटकांतून त्यांनी दाजी भाटवडेकर यांच्या दिग्दर्शनाखाली अनुक्रमे प्रियंवदा व मदनिकेच्या भूमिका केल्या होत्या. त्याच्या रूपाची, भूमिकेची आणि अभिनयकौशल्याची तत्कालीन वृत्तपत्रांतून दखल घेतली गेली होती.
नेत्रा साठे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.